पुढील तीन दिवस महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पाऊस या जिल्ह्यात जास्त पाऊस पडणार

पुढील तीन दिवसात महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पाऊस पडणार असल्याचा हवामान अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्या संदर्भात माहिती या ठिकाणी जाणून घेऊया.

मालदीव ते दक्षिण महराष्ट्र या किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने येणाऱ्या रविवारी म्हणजेज दिनांक २६ रोजी कोकण व मध्य महाराष्ट्रामध्ये मुसळधार पाउस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

२५ व २६ नोव्हेंबर रोजी गुजरात महाराष्ट्र गोवा किनारपट्टी पासून पूर्व मध्य अरबी समुद्रापर्यंत वाऱ्याचा वेग वाढणार आहे त्यामुळे कोकण व मध्य महाराष्ट्रात पाऊस 29 नोव्हेंबर पर्यंत वाढणार आहे.27 रोजी उत्तराखंडमध्ये काही ठिकाणी गारपीट तर दक्षिण अंदमान समुद्र आणि आजूबाजूच्या परिसरात चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे.

खालील जिल्ह्यामध्ये पडणार मुसळधार पाऊस

तमिळनाडू आणि केरळमध्ये समुद्रसपाटीपासून 3.1 चक्राकार वाऱ्याची स्थिती निर्माण होत आहे. या वाऱ्याच्या प्रभावामुळे रविवार पर्यंत कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्यात यामुळे राज्यात पोषक हवामाननिर्माण होत आहे.

कोकणमध्य महाराष्ट्र सह बऱ्याच ठिकाणी तर मराठवाड्यातील काही जिल्ह्यात जोरदार वारे विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

24 ते 27 नोव्हेंबर दरम्यान कोकणातील मेघगर्जनेसह पाऊस

रायगड.

ठाणे.

रत्नागिरी.

सिंधुदुर्ग.

पालघर.

कोल्हापूर.

पुणे.

अहमदनगर.

सातारा.

सांगली.

सोलापूर.

मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर.

जालना.

बीड.

लातूर.

उस्मानाबाद.

आणि धाराशिव.

विदर्भात अकोला.

अमरावती.

बुलढाणा.

वाशिम.

यवतमाळ.

बातमी लिंक

वरील जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अलर्ट असून इतर भागात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी बांधवानी आपल्या शेतातील मालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी जेणे करून मालाचे नुकसान होणार नाही.

Leave a comment