या वर्षी कापूस बाजार खूप मंदावला आहे यामध्ये आता कापूस भावात १७०० रुपयाची घसरण झाली आहे त्या संदर्भात माहिती या ठिकाणी जाऊन घेऊया.
शेतकऱ्यांना चांगल्या भावाची प्रतीक्षा असताना शेतकऱ्यांचा माल अजून घरातच पडून आहे शेतकऱ्यांना अशा आहे कि कापूस भावात वाढ होईल परंतु कापूस भावात आणखी घसरण झाली आहे.
नगदी पिक म्हणून कापसाकडे पहिले जाते पंरतु या वर्षी कापसाची आवक चांगली होत असली तरी भाव मात्र १७०० रुपयांनी घसरला आहे त्यामुळे पुढील हंगामामध्ये कापूस घ्यावा कि नाही अशा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात कापसाला ७५०० क्विंटल भाव मिळाला या वेळेस कापसाची आवक चांगली असताना आणि कापूस सोन्यासारखा असतानाही कापसाच्या भावामध्ये १७०० रुपयाची घसरण झाली आहे.
सध्या कापूस ६८०० रुपयांनी कापूस घेतला जात आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी कापूस घरातच ठेवणे पसंद केले आहे
कापूस भावात वाढ होणार का
कापूस भावात १७०० रुपयाची घसरण पहाता कापूस भावात हि खूप मोठी घसरण आहे त्यामुळे शेतकऱ्यांना कापसाच्या भावात चिंता व्यक्त केली आहे.
गेल्या दोन वर्षापासून शासन शेतमालाकडे लक्ष देत नाही त्यामुळे अनेक संकटांचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे शेतमालाला योग्य भाव दिला तर शेतकरी सुखी होईल.
सध्याचा बाजार भाव पहात कापसाच्या भावात वाढ होणे अशक्य आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य त्या भावात आपला माल विकावा.
मध्ये जर पुढे चालू कापसाची आवक कमी झाली तर भाव वाढण्याची शक्यता आहे.