मित्रांनो सावधान …! क्वीक सपोर्ट नावेचे ॲप तुमच्या मोबाईल मध्ये असल्यास किंवा हे ॲप डाउनलोड करताच तुमचे बँक खाते साफ होऊ शकते तुमच्या मोबाईल मध्ये हे ॲप असेल तर आताच डिटेल करा. मी बँकेतून बोलत हे असे म्हणून एखड्या व्यक्तिला कॉल केला जातो आशा वेळी समोरून आलेल्या अनोळखी कॉलवर बोलल्यावर विश्वास ठेवत सर्वच माहिती संगत असतो.
आशा वेळी काही क्षणातच त्या व्यक्तीचे बँक खाते साफ केले जाते या घटना आता वारंवार घडत आहेत. अज्ञाताकडून फसवणुकीचा नवीन फांडा वापरला जात आहे. काही दिवसापासून ऑनलाइन फसवणुकीच्या घटना वाढल्या असून त्या बाबत विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
हे ॲप डाउनलोड करताच बँक खाते साफ
बँक अधिकारी, कर्मचारी, शासकीय अधिकारी असल्याचे सांगल्या जाते व मोबाईल मध्ये क्वीक सपोर्ट नावेचे ॲप डाउनलोड करण्यास भाग पडले जाते. एकदा हे ॲप मोबाईल मध्ये डाउनलोड झाले की मग आपल्या मोबाईल मधील सर्व डेटा समोरच्या व्यक्तीला आपोआप मिळतो त्यातूनच बँक खाते क्रमांक, ऑनलाईन बँकिंगचे पासवर्ड त्यांच्या हाती लागते
कोणतेही ॲप खात्री करूनच डाउनलोड करा
काही मोबाईल ॲप हे बनावट असल्याचवे समोर आले आहे त्यात आपल्याला हवी असलेली सेवा मिळत नाही. प्रत्येक ॲप डाउनलोड करताना आपल्या मोबाईल मधील माहिती घेतली जाते हे तुम्हाला माहीतच असेल. अनोळखी व्यक्ति एखादे ॲप डाउनलोड करून त्यावर एक रुपया टाका असे सांगते, असे अजिबात करू नका.
ॲपच्या माध्यमातून आपल्या मोबाईल मधून डेटा चोराला जातो. त्यामुळे कोणते मोबाईल ॲप खात्री करूनच डाउनलोड करा. अनोळखी मोबाईलवरील मेसेज, कॉल टाळा.
मोबाईलवर आलेल्या अनोळखी क्रमांकाच्या कॉलला, मेसेजला उत्तर देताना काळजी घेतली पाहिजे.
ओटीपी क्रमांक कोणालाही सांगू नका
आपल्या व्यवहाराचा आलेला ओटीपी क्रमांक गोपनीय असतो तो कोणालाही सांगू नका. अनेक वेळा आपल्या मोबाईलवर कॉल येतो आपल्याकडे आलेला ओटीपी क्रमांक सांगा असे सांगितले जाते आशा वेळी सहज ओटीपी सांगितलं जातो.
हाच प्रकार आपले आर्थिक नुकसान करू शकतो काही क्षणातच आपल्या खत्यावरील रक्कम परस्पर काढून घेतली जाते त्यासाठी सतत जागरूक राहण्याची गरज आहे.