Ladki Bahin Yojana : चार लाख १२ हजारांवर लाडक्या बहिणींना मिळणार डिसेंबरचा हप्ता

Ladki Bahin Yojana महसूल विभागाकडून जिल्ह्यातील लाभार्थी लाडक्या बहिणींची यादी पूर्वीप्रमाणेच मंजूर करण्यात आलेली आहे. जादा उत्पन्न गटानुसार पडताळणी करण्याच्या सूचना नसल्याने सध्या तरी अर्ज पडताळणी होणार नसल्याची स्थिती आहे.

दुसरीकडे, योजनेचा हप्ता महिलांच्या खात्यावर येण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळे ऑक्टोबरमध्ये ज्या लाभार्थी महिलांना हप्ता मिळाला, त्या सर्व चार लाख १२ हजार ७९१ लाभार्थी बहिणींना डिसेंबरचा हप्ता मिळणार आहे.

ऑक्टोबरमधील लाभार्थी बहिणींना योजनेचा दोन महिन्यांचा हप्ता ऑक्टोबर महिन्यात जमा झाला होता. त्यामुळे आता डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा केला जात आहे. मात्र, अद्यापपर्यंत जिल्ह्यात काही लाडक्या बहिणींनाच या हप्त्याची रक्कम मिळाली आहे. टप्प्याटप्प्याने योजनेची रक्कम जमा होणार असल्याचे महिला व बालकल्याण विभागाकडून सांगण्यात आले. Ladki Bahin Yojana

नारीशक्ती दूत अॅप

जिल्ह्यात नारीशक्ती दूत अॅपद्वारे एक लाख ८९ हजार ८९२, तर वेब पोर्टलद्वारे दोन लाख ३७ हजार ७४ असे एकूण चार लाख २६ हजार ९६६ महिलांचे योजनेच्या लाभासाठी अर्ज आले होते. नारीशक्ती दूत अॅपमधील एक लाख ८८ हजार २०९ अर्ज, तर वेब पोर्टलवरील दोन लाख २४ हजार ५८२ अर्ज असे एकूण चार लाख १२ हजार ७९१ अर्ज मंजूर करण्यात आले. तसेच १४ हजार ३७५ अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत.

लाडक्या बहिणींची

तालुकानिहाय मंजूर अर्ज संख्या

• तालुका लाभार्थी महिला

• धाराशिव १ लाख ४१७

• परंडा ३७ हजार १०५

• वाशी २३ हजार ९२२

• भूम ३४ हजार १११

• कळंब ५३ हजार ३७७

• तुळजापूर ७१ हजार ११

• उमरगा ६३ हजार ९११

• लोहारा २८ हजार ९३७

• एकूण ४ लाख १२ हजार ७९१

लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांच्या पडताळणीच्या कोणत्याही सूचना नाहीत. दुरुस्तीच्या कामामुळे पोर्टल सुरू नाही. आधीच्याच मंजूर लाभार्थी यादीप्रमाणेच योजनेचा हप्ता जमा होत आहे.

Leave a comment