लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता खात्यावर जमा झाला आहे. मात्र अजूनही काही महिलांना लाभ घेता येणार का? नव्याने अर्ज करता येणार का असा प्रश्न अनेक महिलांच्या मनात आहे. अशाही काही महिला आहेत ज्यांच्याकडे कागदपत्र नसल्याने तेव्हा अर्ज करता आला नाही पण आता अर्ज करता येईल अशी परिस्थिती आहे. त्या सर्व महिलांसाठी ही माहिती महत्त्वाची आहे.
आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यासंदर्भातला अद्यापतरी निर्णय घेतला गेलेला नाही. आम्ही शेवटची अर्ज दाखल करण्याची मुदत आहे.
आदिती तटकरे म्हणाल्या की अर्ज करण्याची मुदत साधारणपणे 15 ऑक्टोबरपर्यंतची होती आणि बाय लार्जर आम्ही बघितलं तर 2,50,00,000 पेक्षा जास्ती रजिस्ट्रेशन आज आमच्याकडे झालेला आहे.
म्हणजे विभाग म्हणून जो एक साधारणपणे अंदाज योजना आम्ही राबवत असताना किंवा आणताना जो एक ठेवला होता. त्यानुसार रेजिस्ट्रेशन जे आहे ते ऑलमोस्ट 99 टक्के आपण त्याच्यापर्यंत पोहोचलेला होता. लाडकी बहीण योजनेचा
त्यामुळे पुढे रजिस्ट्रेशनची मुदत द्यायची नाही द्यायची हा सगळा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत होईल. त्यासंदर्भातला योग्य तो निर्णय ते आमचे जे तिन्ही नेते आहेत ते घेतील.
15 ऑक्टोबर ही ठरलेली तारीख होती. तारीख वाढवायची का रजिस्ट्रेशन कशापद्धतीनं करायचं? नवीन नियमात 21 वरुन 18 वर वय येईल का निकष बदलणार का याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात येईल. 15 ऑक्टोबर ही ठरवलेली तारीख होती.
त्यानंतर एक दीड महिना आचारसंहितेचा कालावधी गेला. त्यामुळे त्यासंदर्भातली तारीख वाढवून घ्यायची किंवा रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने करायचं हे मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेऊ असं आदिती तटकरे म्हणाल्या.