PM Kisan Yojana पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 ऑक्टोबर 2024 रोजी पीएम किसान सन्मान निधीचा 18 वा हप्ता वितरित केला आहे. याद्वारे 9.40 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात 20 हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम जमा करण्यात आली. पण जर काही कारणास्तव तुमच्या खात्यात पैसे आले नाहीत तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. यामागे अनेक कारणे असू शकतात. तसेच तुम्हाला 19 वा हप्ता आल्यानंतरही पैसे मिळाले नाही तर तुम्ही तक्रार कुठे करू शकता? याची माहिती आम्ही देणार आहोत
हप्त्याचे पैसे न येण्यामागील 5 कारणे कोणते आहेत?
- तुमच्या ई-केवायसी प्रक्रियेत काही समस्या असल्यास, किंवा ई-केवायसी केले नसल्यास, पीएम किसान योजनेचे पैसे अडकू शकतात.
- जर तुमचे बँक खाते आधारशी लिंक नसेल तर तुमच्या खात्यात पैसे येणार नाहीत.
- जर बँक खात्यामध्ये DBT (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर) पर्याय बंद असेल तर हप्ता तुमच्या खात्यात ट्रान्सफर करता येणार नाही.
- याशिवाय, जरी ई-केवायसी तपशील अपडेट केले नाहीत, तरीही पैसे तुमच्या खात्यात येणार नाहीत.
- जर तुम्ही जमीन पडताळणी केली नसेल तर पीएम किसान योजनेचे पैसे अडकू शकतात. PM Kisan Yojana
तक्रार कुठे करायची?
जर तुमच्या खात्यात पीएम किसान योजनेचे पैसे आले नाहीत, तर तुम्ही पीएम किसान 011-23381092 या टोल फ्री हेल्पलाइनवर कॉल करू शकता. याशिवाय pmkisan-ict@gov.in या ईमेल आयडीवर जाऊन तुम्ही मदत घेऊ शकता. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी पीएम किसान ई-मित्र एआय चॅटबॉट देखील सुरू करण्यात आला आहे. जिथे तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे सहज मिळू शकतात.
19 वा हप्ता कधी येणार?
मीडिया रीपोर्टनुसार पीएम किसानचा 19 वा हप्ता हा फेब्रुवारीमध्ये येऊ शकतो. मात्र याबाबतची अधिकृत माहिती केंद्र सरकारकडून अद्याप देण्यात आलेली नाही. PM Kisan Yojana