नवीन विहीर अनुदान सोबतच  सौर उर्जा पंप मिळणार GR आला

नमस्कार शेतकरी बंधूंनो आता काही दिवसपूर्वी विहीर अनुदान योजनेविषयी माहिती आम्ही आमच्या वेबसाइटला प्रकाशित केली होती आणि आता नवीन विहीर खोदकाम अनुदान सोबतच  सौर उर्जा पंप सुद्धा मिळणार आहे याच संबंधी माहिती आपण आज जाणून घेणार आहोत.

शेतकऱ्यांचे शेतीतील उत्पन्न वाढावे यासाठी शासनाच्या वतीने विविध योजना राबविल्या जातात. नवीन विहीर खोदकाम अनुदान सोबत 5 HP सौर उर्जा पंप या योजनेचा उद्देश असा आहे कि शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती व्हावी.

नवीन विहीर अनुदान जी आर आला

तुमच्याकडे जर शेती असेल तर शेतामध्ये विहीर खोडून पिकांसाठी पाण्याची व्यवस्था तुम्ही करू शकता. सध्या प्रचंड प्रमाणामध्ये महागाई वाढली असून पिकांना पाणी देण्यासाठी विहीर खोडणे शेतकऱ्यांस परवडण्यासारखे नसते. अशावेळी तुम्ही विहिरी खोदकामासाठी शासकीय अनुदानाचा लाभ घेवू शकता

विहीर खोदकाम आणि विहिरीवर सोलर पंप म्हणजेच सौर उर्जा पंप बसविण्यासाठी शासन अनुदान देणार आहे आणि या संदर्भातील शासन निर्णय नुकताच शासनाच्या अधिकृत संकेत स्थळावर निर्गमित करण्यात आलेला आहे.

जी आर बघा

योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी कागदपत्रे

  • जात प्रमाणपत्र.
  • रहिवासी दाखला.
  • वनहक्क कायद्याद्वारे वनपट्टा प्राप्त झाल्याचे प्रमाणपत्र.
  • सोलार पंप मिळविण्यासाठी जलस्त्रोत उपलब्ध असल्याचा दाखला.
  • यापूर्वी या योजनेचा लाभ घेतला नसल्याचे प्रमाणपत्र.
  • ज्या ठिकाणी विहीर खोडणे प्रस्तावित आहे त्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता असल्याचे प्रमाणपत्र.

योजनेविषयी थोडी माहिती खालीलप्रमाणे

  • काय आहे या योजनेचा उद्देश : अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना वनहक्क कायदा अंतर्गत वनपट्टे मिळालेले आहेत अशा शेतकऱ्यांच्या म्हणजेच लाभार्थींच्या शेती उत्पन्नात वाढ व्हावी या उद्देशाने शेतीला पाणी पुरवठा करण्यासाठी नवीन विहीर करणे व त्यावर सौर उर्जा पंप बसविणे.
  • योजनेसाठी निधी : १८०० लक्ष.
  • योजनेचा कालावधी : १ वर्ष.
  • योजनेचे कार्यक्षेत्र : महाराष्ट्र राज्य.
  • योजनेची अमलबजावणी करणारी यंत्रणा : – १) विहिर – संबधित प्रकल्प अधिकारी, २) एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प व कृषी विभाग ३) भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा ३) ग्रामीण पाणी पुरवठा व इतर शासकीय योजना.

Leave a comment