online Land Survey 2025 तुम्हाला जर ऑनलाईन जमीन मोजणी करायची असेल तर आता तुम्ही देखील या योजनेसाठी अर्ज करू शकता हा अर्ज कसा करायचा व कोठे करायचा ही सर्व माहिती आपण आज या लेखामध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे ही माहिती शेवट पर्यंत वाचा.
अर्जदार दोन पद्धतीने जमीन मोजणीसाठी अर्ज करू शकतो. पहिली पद्धत म्हणजे ऑनलाईन पद्धत आणी दुसरी पद्धत म्हणजे offline पद्धत. या दोन्ही पद्धती सोप्या आहे पण तुम्हाला जी पद्धत सुरळीत वाटेल तुम्ही त्या पद्धतीने अर्ज करू शकता.
आपल्या शेताची जर मोजणी झालेली नसेल तर यामुळे शेताच्या बांधावरून खूप वाद होतात. हे वाद टाळण्यासाठी जमीन मोजणी करणे खूप आवश्यक आहे. जमीन मोजणीसाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने सुद्धा अर्ज करू शकता. या पोस्टमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे. online Land Survey 2025
ऑनलाईन अर्ज प्रक्रिया ही जास्त सोपी आहे जर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज कराल तर यामध्ये तुमचे पैसे आणी टाईम या दोन्ही गोष्टी वाचेल त्यामुळे आपण सर्वात पहिले ऑनलाईन कसा करायचा ही माहिती बघूया खालीलप्रमाणे.
असा करा जमीन मोजणीसाठी अर्ज
अर्ज करण्यासाठी तुम्हाला आपले सरकार या वेबसाईट वर जायचे आहे आणी तुमची id password टाकून लॉगीन करायचे आहे.
या ठिकाणी तुम्हाला तुमचा महसूल विभाग निवडायचा आहे. यानंतर तुम्हाला अभिलेख सेवा असे बटन दिसेल त्यावर टच करा. आता या ठिकाणी तुम्हाला बरेच पर्याय दिसेल त्यापैकी तुम्हाला जमीन मोजणी हा पर्याय निवडायचा आहे.
तुम्हला Ordinary Cases असा एक पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा. यानंतर तुम्हाला तुमची माहिती भरायची आहे. तुम्हाला काही माहिती माहिती विचारण्यात येईल जसेकी तुमचा जिल्हा, तालुका गाव ही माहिती तुम्हाला योग्य प्रकारे भरायची आहे आणी सबमिट करायची आहे.
ही माहिती भरल्यावर तुम्हाला आणखी काही पर्याय या ठिकानी दिसेल त्यामधून सर्व्हे या वर टच करा. यानंतर boundary confirmation या वर क्लिक करा.
आता परत तुम्हाला तुमची काही माहिती भरायची आहे ही माहिती योग्य रित्या भरा व भरलेली माहिती ही पूर्णपणे बरोबर आहे याची खात्री करा.
जर तुम्हाला मोजणी नकाशा हा पोस्टाद्वारे हवा असेल तर तुम्ही पोस्टाद्वारे सुद्धा घेऊ शकता किंवा प्रत्यक्ष भेट घेऊन सुद्धा घेऊ शकता.
अर्ज केल्यावर तुम्हाला या ठिकाणी मोजणी फी भरावी लागणार आहे.
सर्व माहिती ही योग्य आहे याची खात्री करा आणी सबमिट करा.
अशा प्रकारे तम्ही जमीन मोजणी साठी अर्ज करू शकता. online Land Survey 2025