नमो शेतकरी सन्मान योजना पैसे आले नाही तर लगेच बघा कसे करायचे दुरुस्त.

जर तुम्हाला पीएम किसान सन्मान निधीचे पैसे मिळत असेल तर तुम्हाला नमो शेतकरी सन्मान योजना चे देखील पैसे मिळायला हवे पण जर तुम्हाला या योजने द्वारे पैसे मिळत नसेल तर तर त्यासाठी काय करायचे ते आपण बघणार आहोत सविस्तरपणे.

पीएम किसान सन्मान निधीचे प्रत्येक वर्षी ६ हजार रुपये शेतकरी बांधवांना मिळतात त्याच प्रमाणे या योजनेचे देखील वार्षिक ६ हजार मिळणार आहे म्हणे वर्षाला एकूण १२ हजार.

जर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळत नाही तर तो का मिळत नाही हे आपण जाणून घेऊया सोबतच योजनेचा लाभ घेण्यासाठी काय करावे लागणार आहे ते देखील आपण या लेखामध्ये बघणार आहोत.

जर तुम्हाला पीएम किसान सन्मान निधीचे पैसे नियमित पणे मिळत असेल तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे.

नमो शेतकरी सन्मान योजना हफ्ता का मिळत नाही बघा मोबाईल वर.

तुम्हाला या योजनेचा लाभ का मिळत नाही आणी त्याचे कारण काय हे सर्व तुम्ही तुमच्या मोबाईल वर देखील चेक करू शकता खालील प्रमाणे.

chrome ब्राउझर किंवा इतर कोणतेही ब्राउझर मध्ये pm kisan sanman nidhi  हे search करा पेग ओपन झाल्यावर याठिकाणी तुम्हाला तीन पर्याय दिसेल.

  • new farmer registration.
  • e-KYC.
  • Know Your Status.

यापैकी तुम्हाला Know Your Status हा पर्याय निवडा पुढे चौकटीत तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे क्यापाच्या भरा.

तुमच्याकडे जर रजिस्ट्रेशन नंबर नसले तर know your registration number या पर्यायावर क्लिक करा.

हे आल्यावर तुमचे नाव सर्च करा.

पीएम किसान रजिस्ट्रेशन

मोबाईल हा पर्याय निवडा तुमचा मोबाईल नंबर टाका कॅपचा टाका otp मिळवा या बटनाला दाबा otp हा खालील चौकाटीत टाका.

लगेचच तुम्हाला या ठिकाणी तुमचा रजिस्ट्रेशन क्रमांक मिळेल हा रजिस्ट्रेशन क्रमांक खूप महत्वाचा आहे त्यामुळे चांगला ठेवा.

copy केलेला रजिस्ट्रेशन क्रमांक हा तुम्हाला https://pmkisan.gov.in/BeneficiaryStatus_New.aspx या ठिकाणी टाकायचा आहे आणी गेट डीटेल्स या पर्यायावार्ती तच करा.

या नंतर तुम्हाला FTO Processed असा पर्याय दिसेल त्यापुढे yes किवा no या पैकी एक पर्याय दिसेल जर yes असेल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण नाही.

पण जर no असेल तर पेग च्या खाली तुम्हाला Reason of FTO Not processed म्हणून पर्याय दिसेल आणि या ठिकाणी ते कारण असेल ज्यामुळे तुम्हाला या योजनेचा लाभ मिळत नाही.

Leave a comment