ग्रामीण भागातील गरीब परिवारातील मुलींसाठी ही लेक लाडकी योजना राबविण्यात येत आहे. या योजने अंतर्गत मुलींना आर्थिक मदत देण्यात येणार आहे.
जर लाभार्थ्याला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर अर्ज करावा लागणार आहे. हा अर्ज कोठे करायचा कसा करायचा आणि यासाठी लागणारे महत्वाचे कागदपत्रे कोणते आहे ही संपूर्ण माहिती या लेखामध्ये दिलेली आहे त्यामुळे माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा.
लेक लाडकी योजनेचा जीआर सुद्धा महाराष्ट्र शासनातर्फे निर्गमित करण्यात आलेला आहे. जर तुम्हाला या योजनेचा जीआर बघायचा असेल तर खालील बटनावर क्लिक करा.
या योजने अंतर्गत गरीब परिवारातील मुलींना आर्थिक मदत मिळणार आहे जेणेकरून त्याचे पुढील भविष्यातील शिक्षण व इतर गरजा पूर्ण होईल.
लेक लाडकी योजना अंतर्गत किती मिळेल अनुदान
या योजने अंतर्गत अनुदान सुद्धा मिळणार आहे हे अनुदान किती मिळणार आहे कोणाला मिळणार आहे आणि किंवा मिळणार आहे बघा खालीलप्रमाणे.
या योजनेचा लाभ फक्त केशरी आणि पिवळे रेशनकार्ड धाराकांना मिळणार आहे. पात्र लाभार्थी मुलीला एकूण ५ टप्प्यांमध्ये अनुदान देण्यात येणार आहे.
अनुदानाचे टप्पे.
१. मुलीचा जन्म झाल्यावर म्हणजेच पहिला टप्पा यामध्ये एकूण ५०००/- रुपये देण्यात येणार आहे.
२. लाभार्थी मुलीचा प्रवेश इयत्ता पहिलीमध्ये झाल्यानंतर म्हणजेच दुसरा टप्पा यामध्ये एकूण ६०००/- रुपये इतके अनुदान देण्यात येणार आहे.
३. मुलीचा प्रवेश इयत्ता सहावीत झाल्यावर. हा तिसरा टप्पा आहे. यामध्ये ७०००/- रुपये पात्र लाभार्थी मुलीला देण्यात येणार आहे.
४. इयत्ता अकरावीमध्ये ८०००/- रुपये.
५. शेवटच्या टप्प्यामध्ये एकूण ७५००० हजार रुपये पात्र लाभार्थी मुलीला देण्यात येणार आहे जेव्हा मुलीचे वय हे १८ वर्ष पूर्ण असेल.
अशा प्रकारे या लेक लाडकी योजना अंतर्गत पाच टप्प्यांमध्ये एकूण १,०१,००० रुपये पात्र लाभार्थी मुलीला मिळणार आहे.
अर्ज करण्यासाठी कोणते कागदपत्रे आवश्यक आहे बघा खालीलप्रमाणे.
कागदपत्रे
लाभार्थी मुलीचा जन्म दाखला आणि वडिलांचे आधार कार्ड.
बँक पासबुक झेरॉक्स.
केशरी किंवा पिवळे रेशनकार्ड.
शाळेचा दाखला (दुसऱ्या टप्प्यापासून)
वार्षिक उत्पन्न १ लाखापेक्षा कमी आहे या प्रमाणपत्र.
शेवटचा लाभ घेण्यासाठी स्वयं घोषणापत्र (लाभार्थी मुलीचे लग्न झाले नाही याचे).
असा करा अर्ज
लेक लाडकी या योजनेचा अर्ज हा जीआरच्या खाली दिलेला आहे. जर तुम्हाला अर्ज आणि जीआर डाऊनलोड करायचा असेल तर तुम्ही करू वरील बटनावर क्लिक करून डाऊनलोड करू शकता.
हा अर्ज सविस्तरपणे भरून तुमच्या गावातील अंगणवाडी सेविका जवळ सादर करावा लागणार आहे.