शेतकऱ्यांना आठ दिवसांत पीकविमा परतावा मिळणार Crop Insurance Compensation

Crop Insurance Compensation पीकविमा न मिळालेल्या आंबा, काजू बागायतदारांना आठ दिवसांत परतावा मिळेल, असे आश्वासन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी जिल्हा कृषी अधीक्षकांशी चर्चा केल्यानंतर शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) पदाधिकाऱ्यांना दिले.

जिल्ह्यातील पाच मंडलांतील शेतकरी अद्याप आंबा, काजू पीकविमा परताव्यापासून वंचित आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांना पीकविमा परतावा द्यावा अन्यथा २९ जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेनेकडून देण्यात आला होता. Crop Insurance Compensation

त्या अनुषंगाने मंगळवारी (ता. २१) माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार परशुराम उपरकर, माजी आमदार राजन तेली, संदेश पारकर, सतीश सावंत, राजन नाईक, सुशील चिंदरकर, बाबू आसोलकर आदींनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली.

या भेटीदरम्यान जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी जिल्हा कृषी अधीक्षकांशी चर्चा केली. कृषी अधीक्षकांनी आठ दिवसांत परतावा मिळणार असल्याचे स्पष्ट केल्यानंतर जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना आठ दिवसांत परतावा मिळण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे शिवसेनेकडून होणारे आंदोलन आता स्थगित करण्यात आले आहे.

Leave a comment