शेतकरी सन्मान निधीचा १९वा हप्ता लवकरच जमा होणार; या शेतकऱ्यांना मिळणार नाही फायदा Shetkari Samman Nidhi

Shetkari Samman Nidhi: केंद्र सरकारनं सुरु केलेल्या ‘शेतकरी सन्मान निधी’चा १९ वा हप्ता
लवकरच देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. याची तारीख आणि किती पैसे मिळणार हे समोर आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एका जाहीर कार्यक्रमात या निधीचं वाटप केलं जाणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २४ फेब्रुवारी रोजी बिहारच्या भागलपूर इथून एका जाहीर कार्यक्रमात शेतकरी सन्मान निधीचा १९ वा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार आहेत. याच दिवशी देशातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात होईल. शेतकऱ्यांच्या खात्यात या हप्त्यापोटी ६००० रुपये जमा होणार आहेत. देशातील १३ कोटींहून अधिक शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे.

‘या’ शेतकऱ्यांना मिळणार नाही लाभ

भागलपूर जिल्ह्याचे उपकृषी संचालक विकेश पटेल यांनी सांगितलं की, ज्या शेतकऱ्यांनी जनसेवा केंद्रांमध्ये जाऊन शेतकरी नोंदणी केलेली नाही त्यांना हा हप्ता मिळू शकणार नाही. या नोंदणीसाठी अजूनही शेतकऱ्यांना एक आठवडा बाकी आहे, त्यामुळं ज्या शेतकऱ्यांची नोंदणी बाकी आहे त्यांनी ती त्वरीत करुन घ्यावी, यासाठी आपला मोबाईल क्रमांकही देणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं. Shetkari Samman Nidhi

Leave a comment