लाडकी बहिण योजनेत नवे नियम , लाडक्या बहिणीच्या अडचणीत वाढ अपडेट आली समोर

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेत अपात्र लाभार्थ्यांना लाभ सोडण्याचं आवाहन सरकारकडून करण्यात आलंय. आतापर्यंत साडे पाच लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या आहेत. दरम्यान, सरकारकडून आता नवे नियम लागू केले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. लाडकी बहीण योजनेचा हफ्ता आता प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या आठवड्याला दिला जाणार आहे. तर अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असल्यास योजनेचा लाभ घेता येणार नाही. याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

लाडकी बहिण योजनेत हफ्ता प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात दिला जाणार आहे. मात्र लाडक्या बहिणींचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असल्याच लाभ मिळणार नाही. ज्या कुटुंबाचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे त्यांना या योजनेतून वगळण्याचा निर्णय सरकारने घेतल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. लाडक्या बहिणींचं इन्कम टॅक्स रेकॉर्ड तपासलं जाणार आहे. दरवर्षी जून महिन्यात ई केवायसी करावी लागणार आहे. उधळपट्टीला लगाम घालण्यासाठी योजनेत सुधारणा करण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती समजते.

नवे नियम –

  • दरवर्षी जून ते जुलै मध्ये ई केवायसी करणं अनिवार्य
  • लाभार्थी हयात आहे की नाही याचीही तपासणी होणार
  • अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असल्यास लाभ मिळणार नाही
  • लाडक्या बहिणींचं इन्कम टॅक्स रेकॉर्ड तपासण्यात येणार
  • जिल्हा स्तरावरून फेरतपासणी करून त्यांना अपात्र ठरवण्यात येणार आहे.

Leave a comment