Ladki Bahin Yojana update : महाराष्ट्र शासनाचे महिलांसाठी सुरुवात केलेली माझी लाडकी बहीण योजना राज्यभरात सुपरहिट ठरली आहे, ही योजना विधानसभा निवडणुकीदरम्यान गेम चेंजर ठरली व माहिती सरकारला भरघोस यश मिळाले.
राज्य शासनातर्फे राज्यातील 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत 7 हप्ते वितरित करण्यात आले, यादरम्यान पात्र महिलांना प्रति महिना 1500 रुपये देण्यात आले. ( Ladki Bahin Yojana update
लाडकी बहिणीचा फेब्रुवारी महिन्याच्या 8वा हप्ता कधी येणार
आता फेब्रुवारी महिन्याच्या आठवा हप्त्याची प्रतीक्षा महिलांना लाभार्थींना लागलेली आहे, महिलांमध्ये अर्जाची पडताळणी होणार असल्यामुळे त्यांच्या मनामध्ये आठवा महिना येणार की नाही याबद्दल भीती निर्माण झालेली आहे
ज्या महिलांनी निकषांच्या बाहेर जाऊन या योजनेचा लाभ घेतलेला आहे, अशा महिलांना या योजनेतून बाहेरच्या रस्ता दाखवण्यात येणार आहे.
लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याच्या आठवा हप्ता 24 फेब्रुवारी पासून सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे, यासाठी अर्थमंत्री अजित पवार यांनी संबंधित विभागाच्या कडे पैसे हस्तांतरित करण्यात आले आहे अशी माहिती मिळाली आहे. Ladki Bahin Yojana update
या महिला 8वा हप्त्यापासून वंचित
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेसाठी सरकारने आता काही निकष लागू केले आहे. यासाठी सरकारने आता काही कठोर पावले उचलले जाणार आहे, म्हणून सर्व पात्र व गरजू महिलांना या योजनेचा लाभ मेळावा यासाठी ही नवे निकष लागू करण्यात येणार आहेत.
लाडकी बहीण योजनेत लाभार्थी महिलांना आता प्रत्येक वर्षी जून महिन्यात बँकेत जाऊन ई- केवायसी करून हयातीचा दाखला काढावा लागणार आहे.यासाठी एक जून ते एक जुलै दरम्यान ई केवायसी करावी लागणार आहे.
ज्या महिलांनी इतर सरकारी योजनेच्या लाभ घेतलेला आहे व त्यांचे उत्पन्न अडीच लाख पेक्षा जास्त असा, अशा महिलांना या योजनेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात येणार आहे व त्यांना अपात्र करण्यात येणार आहे.
या योजनेतील सुमारे 16.5 लाख लाभार्थी महिलांच्या खात्यावर थेट पैसे पाठवण्यात आल्यानंतर त्यांचा अर्ज वरील नांव दिलेली नावे व पैसा जमा झालेल्या बँक खात्यावरील नावे याच्यात तफावत आढळून आली आहे.
अशा लाभार्थी जिल्हास्तरावरून अर्जाची पुनर तपासणी होणार आहे व अपात्र आढळल्यास लाडक्या बहिणी योजनेचा अपात्र ठरवून आणणार आहे व त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.