Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना मोठा धक्का ! 40 लाख लाभार्थी ‘या’मुळे ठरणार अपात्र

Ladki Bahin Yojana राज्य सरकारच्या लाडकी बहिण योजनेतून लाभ घेणाऱ्या महिलांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांच्या अर्जाची काटेकोरपण पडताळणी होत असून राज्य सरकारने 9 लाख अपात्र महिलांची नावे योजनेतून काढण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र आता निकषांनुसार पडताळणी केल्यानंतर ही संख्या तब्बल 40 लाखांच्या घरात जाण्याची शक्यता आहे. कोणत्या निकषांमुळे लाडक्या अपात्र ठरल्यात जाणून घेऊया.

संजय गांधी निराधार योजना 2 लाख 30 हजार

65 वर्षांहून अधिक वय असलेल्या – 1 लाख 10 हजार

चार गाडी असलेल्या, नमोशक्ती योजना लाभार्थी आणि स्वेच्छेनं नाव मागे घेणाऱ्यांची संख्या 1 लाख 60 हजार

फेब्रुवारीत छाननी प्रक्रियेनंतर अपात्र ठरलेल्या – 2 लाख

सरकारी कर्मचारी, दिव्यांगांमधून अपात्र ठरलेल्या – 2 लाख

यापुढे ‘लाडकी बहिण’ योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकार नवीन निकष लागू करणार आहे. लाभार्थी महिलांना दरवर्षी जून महिन्यात बँकेकडे ‘ई-केवायसी’ आणि जीवन प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक असेल. सरकारच्या नव्या निर्णयामुळे, या योजनेचा लाभ फक्त पात्र महिलांनाच मिळेल, असे सांगण्यात येत आहे. Ladki Bahin Yojana

लाडकींची संख्या घटल्यामुळे सरकारचे कोट्यावधी रुपये वाचले आहेत. कारण या योजनेमुळे इतर योजनांच्या निधींना कात्री लागली आहे. तसेच सरकारी खर्चात 30 टक्के कपात करण्यात आली आहे. योजनेचा सर्वाधिक फायदा पुणे, अहिल्यानगर जिल्ह्यातील महिलांनी घेतला आहे. सिंधुदुर्ग, गडचिरोलीतील लाभार्थ्याचं प्रमाण सर्वात कमी आहे. 30-39 वयोगटातील लाभार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे. Ladki Bahin Yojana

कोणत्या महिला होणार अपात्र ?

या योजनेतील सुमारे 16.5 लाख महिलांच्या खात्यावर थेट पैसे पाठविण्यात आले होते त्यांनी अर्जात दिलेली नावे आणि पैसे जमा झालेल्या बँक खात्यावरील नावे यात तफावत आढळून आली आहे. अशा लाभार्थी महिलांची जिल्हास्तरावरून फेरतपासणी करण्यात येणार असून त्यात अपात्र आढळलेल्या लाडक्या बहिणींना अपात्र ठरविण्यात येणार आहे. ज्या महिलांचे आधार कार्ड या योजनेशी लिंक नसेल, त्यांनाही या योजनेतून बाद केले जाणार असल्याची असे समजते.

Leave a comment