PM Kisan Samman Yojana देशातील शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने पीएम किसान सन्मान योजना सुरु केली. या योजनेच्या धर्तीवर शेतकऱ्यांना ६ हजार रुपये दिले जात होते. यात लवकरच वाढ होणार असल्याची म्हटले जात आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी किसान सन्मान योजनेच्या अंतर्गत मिळणारे रकमेमध्ये वाढ होण्याची घोषणा केली आहे.
नागपुरातल्या वनामती येथे एका कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. त्यावेळा माध्यमांशी संवाद साधताना फडणवीस यांनी पीएम किसान सन्मान योजनेच्या पैशांमध्ये वाढ होणार असल्याची माहिती दिली. सध्या या योजनेअंतर्गत देशभरातल्या शेतकऱ्यांना ६ हजार रुपये दिले जात आहे. यात लवकरच राज्य सरकार ३ हजार रुपयांची वाढ करणार आहे.
देशभरातील असंख्य शेतकरी मागील अनेक महिन्यांपासून १९ व्या हफ्त्याच्या प्रतिक्षेत होते. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशभरातल्या शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान योजनेअंतर्गत १९ व्या हफ्त्याच्या पैशांचे वाटप करण्यात आले. पंतप्रधान यांनी ९ कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये २२ कोटी रुपये पाठवले. PM Kisan Samman Yojana
सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बिहारच्या दौऱ्यावर आहेत. बिहारच्या भागलपूरमध्ये त्यांनी किसान सन्मान योजनेच्या १९ व्या हफ्त्याची घोषणा केली. त्यांनी ९.७ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे पाठवण्यात आले. या योजनेमार्फत शेतकऱ्यांना ६ हजार रुपये मिळत आहेत. पण त्यांना लवकरच ९ हजार रुपये मिळतील अशी माहिती समोर आली आहे. PM Kisan Samman Yojana