Drought subsidy scheme : दुष्काळी अनुदानापासून या जिल्ह्यातील पाच हजार शेतकरी वंचित

Drought subsidy scheme खरीप हंगाम २०२३ मध्ये राज्यातील ४० तालुक्यातील दुष्काळी तालुक्यात शिंदखेडा तालुक्याचा समावेश होता. शासनाने दुष्काळी अनुदानासाठी सुमारे ८६ कोटी मतदतीपोटी शिंदखेडा तालुक्याला दुष्काळी अनुदान देण्यात आले आहे.

एकूण ६७ हजार ४९२ शेतकऱ्यांपैकी ६१ हजार ९७८ शेतकऱ्यांनी मदतीचा लाभ घेतला असून, पाच हजार ५१४ शेतकरी दोन वर्षांपासून मदतीपासून वंचित आहे. त्यात तीन हजार १७९ शेतकऱ्यांची केवायसी झाली नसल्याने ते मदतीपासून वंचित आहेत.

शिंदखेडा तालुक्यात २०२३ खरीप हंगामात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने पिके वाया गेल्याने तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. राज्य शासनाने ३१ ऑक्टोबर २०२३ ला आदेश काढून दुष्काळ जाहीर केला होता. त्यात शिंदखेडा तालुक्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. जिरायत पिकांसाठी हेक्टरी आठ हजार ५००, बागायती पिकांसाठी हेक्टरी १७ हजार ५०० रूपये व फळ बागेसाठी २२ हजार ५०० रूपये मदत जाहीर करण्यात आली आहे. Drought subsidy scheme

केवायसीसाठी हेलपाटे

दुष्काळी अनुदानासाठी ‘मदत व पुनर्वसन विभाग, महाराष्ट्र शासन नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत आधार प्रमाणीकरण पावती’ म्हणजे केवायसी करणे शेतकऱ्यांना ई-सेवा केंद्रावर जाणे बंधनकारक आहे. मदत व पुनर्वसन विभागाची साईड त्यावेळी चालत नसल्याने तीन हजार १७९ शेतकऱ्यांची केवायसी होवू शकली नाही. Drought subsidy scheme

प्रशासनाने शोधमोहीम राबवावी

शिंदखेडा तालुक्यात दुष्काळी मदतीपासून वंचीत असलेल्या शेतकऱ्यांचा गावातील तलाठी, कृषी सहाय्यक व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या मदतीने तालुक्यातील प्रत्येक गावात जावून शोध मोहीम राबविण्याची गरज निर्माण झाली आहे. तालुक्यातील एकही शेतकरी मदतीपासून वंचीत राहणार नाही, याची खबरदारी प्रशासनाने घेतली पाहीजे.

Leave a comment