Solar Fencing Subsidy: सौर कुंपणासाठी १००% अनुदान: वनमंत्री नाईक यांची मोठी घोषणा!

Solar Fencing Subsidy व्याघ्र प्रकल्पाशेजारी असलेल्या गावांमधील शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदानात सौर कुंपण उपलब्ध करून देण्यात येईल, अशी घोषणा वनमंत्री गणेाश नाईक यांनी विधानसभेत केली. त्यासंदर्भातील आदेश आधीच दिल्याचीही माहिती त्यांनी सभागृहात दिली. काँग्रेसचे सदस्य विजय वडेट्टीवार, अस्लम शेख, नरेंद्र भोंडेकर, संजय मेश्राम, विकास ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर नाईक यांनी माहिती दिली.

भंडाऱ्यालगत असलेल्या कोका वन्यजीव अभयारण्याच्या बफर झोनपासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या कवलेवाडा येथील जंगलात सरपण गोळा करण्यासाठी गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला केला. यात ती मृत्युमुखी पडली. बीटी १० ही वाघीण आणि तिचा दोन वर्षांचा बछडा नरभक्षक असून त्याला जंगलात सोडण्यास नागरिकांनी विरोध केला तरीही वन विभागाने विरोध झुगारून त्यांना जंगलात सोडले आहे. Solar Fencing Subsidy

त्यामुळे गंडेगाव, सावरला, चन्नेवाडा, कन्हाळागाव, घानोरी, सिरसाळा, वायगाव, भुयार ही गावे भीतीच्या छायेखाली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना शेती करणे अवघड झाले आहे. शेतकऱ्यांना भीतीमुक्त करण्यासाठी सौर कुंपण आणि चेन फेन्सिंग मोफत उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी केली. तसेच वाघांचे स्थलांतर करावे, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. Solar Fencing Subsidy

यावर उत्तर देताना वनमंत्री नाईक म्हणाले, की वाघीण आणि तिच्या बछड्याकडून हल्ले होत आहेत, ही बाब खरी आहे. या बीटी १० या वाघिणीच्या बछड्याला पकडून अन्यत्र हलविण्याचे आदेश दिले आहेत. तसेच शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी सौर कुंपण योजनेअंतर्गत शेतकरी हिस्सा रद्द करून १०० टक्के अनुदान देण्यात येईल. यासाठी २०० कोटी रुपये मंजूर झाले आहेत. चेन फेन्सिंगसाठी अधिक निधी मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न करू.

Leave a comment