Farmer ID : पीएम किसान ते शासकीय अनुदानापर्यंत फक्त ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार लाभ, नवीन नियम काय?

Farmer ID केंद्र आणि राज्य सरकारच्या कृषीविषयक योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत जलद आणि प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी ‘अॅग्रिस्टॅक’ प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. या उपक्रमाद्वारे शेतकऱ्यांच्या जमिनीची संपूर्ण माहिती, आधारशी संलग्न वैयक्तिक तपशील आणि भू-संदर्भीय डेटा एकत्रित करून विशेष शेतकरी ओळख क्रमांक देण्यात येणार आहे.

केंद्र आणि राज्य सरकारच्या कृषीविषयक योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत जलद आणि प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी ‘अॅग्रिस्टॅक’ प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. या उपक्रमाद्वारे शेतकऱ्यांच्या जमिनीची संपूर्ण माहिती, आधारशी संलग्न वैयक्तिक तपशील आणि भू-संदर्भीय डेटा एकत्रित करून विशेष शेतकरी ओळख क्रमांक देण्यात येणार आहे. Farmer ID

शेतकरी ओळख क्रमांक अनिवार्य का?

शेतकरी ओळख क्रमांक नसल्यास सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेणे कठीण होणार आहे. या प्रणालीमुळे शेतकऱ्यांना पीककर्ज, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, पीकविमा योजना, बाजारभाव आणि हमीभावासह खरेदी नोंदणी प्रक्रिया सोपी होईल. डिजिटल डेटा उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांना त्वरित लाभ मिळण्यास मदत होईल. Farmer ID

Leave a comment