२५ टक्के अग्रिम रक्कम १० डिसेंबर पर्यंत संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार शेवटचा टप्पा

पिक विमा काढलेल्या शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रिम रक्कम येत्या १० डिसेंबर पर्यंत संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांना वितरीत करण्याचे आदेश देण्यात आले आहे त्या संदर्भात माहिती या ठिकाणी जाणून घेऊया.

राज्यातील विमा धारक शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रिम विम्याची रक्कम एका महिन्यात मिळणे अपेक्षित असताना तीन महिन्यानंतरहि सदरील रक्कम शेतकऱ्यांना देण्यात आली नाही.

त्यामुळे संबंधित विमा कंपनीवर कारवाई करण्याची मागणी भारत राष्ट्र समितीने केली होती.

त्या अनुशंगाने पीकविमा कंपनीने २० नोव्हेंबर पर्यंत रक्कम वितरीत करण्यात येईल असे कळवून देखील रक्कम वितरीत न केल्याने अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात आली.

त्यामुळे संबंधित विमा कंपनीने विभागीय अधिकारी संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन १० डिसेंबरच्या आत २५ टक्के पीकविमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल असे आश्वासन दिले.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a comment