या दिवशी मिळणार पीएम किसान योजनेचा 20 वा हफ्ता

पीएम किसान योजनेचा 20 वा हफ्ता लवकरच मिळणार पहा सविस्तर माहिती.

पात्र शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रुपये दिले जातात. या योजनेचा २ हजाराचा पुढील हफ्ता कधी मिळेल याकडे सद्या शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे.

पीएम किसान योजना अंतर्गत वर्षाला मिळणारे 6 हजार रुपये DBT अर्थात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर पद्धतीने थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हे जमा केले जाते.

याच योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र शासन देखील शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजना अंतर्गत वार्षिक ६ हजार रुपये देते.

पीएम किसान सन्मान निधीचे १९ हफ्ते मिळाले असून आता २० वा हफ्ता कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे.

पुढील महिन्यात मिळणार 20 वा हफ्ता

पीएम किसान योजनेचा 20 वा हफ्ता पुढील महिन्यात म्हणजेच जून 2025 मध्ये मिळणार आहे.

पीएम किसान सन्मान निधी योजनेमध्ये अनेक नागरिकांनी स्वतः नोंदणी केली आहे. यामुळे पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या यादीत आणखी 50 हजार लाभार्थ्यांची भर पडणार आहे.

महाराष्ट्र राज्यात पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या 92.89 लाख एवढी होती.

पुढील हफ्त्यासाठी लाभार्थी संख्या वाढणार असल्याने निधी देखील वाढणार आहे. भूमी अभिलेख नोंदी, एकेवायसी व बँक खाते आधार संलग्न केल्यामुळे पीएम किसान योजनेच्या पात्र लाभार्थ्यांची संख्या देखील वाढलेली आहे.

बातमी पहा

पीएम किसान योजनेसाठी अनेकांनी स्वत: केले अर्ज

योजनेचा लाभ घेण्यासाठी अनेकांनी पीएम किसान सन्मान निधीच्या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज केले आहेत. ज्या लाभार्थ्यांना पीएम किसान सन्मान निधीचा पात्र असूनही लाभ मिळत नसेल अशांनी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज सादर करावेत.

पीएम किसान सन्मान निधी वेबसाईट लिंक.

काही प्रकरणात योजनेचे काही हफ्ते मिळाले नंतर बंद झाले. पीएम किसान सन्मान निधी योजनेसाठी पात्र शेतकरी मिळालेल्या हफ्त्यांचा तपशील ऑनलाईन बघू शकतात.

पीएम किसान सन्मान निधीचे किती हफ्ते मिळाले या संदर्भात ऑनलाईन माहिती घेवून जर हफ्ता बंद झाला असेल तर तो का बंद झाला या संदर्भात माहिती मिळू शकता.

पीएम किसान सन्मान निधीचे स्टेट्स चेक करण्यासाठी खालील पद्धतीचा अवलंब करा.

  • पीएम किसान सन्मान निधीच्या वेबसाईटला भेट द्या.
  • वेबसाईटवरील बेनिफिशरी लिस्ट या पर्यायावर क्लिक करा.
  • राज्य, जिल्हा, गट आणि गाव निवडून गेट रीपोर्ट या बटनावर क्लिक करा.

वरील पद्धतीचा अवलंब करून तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी योजनेतून किती हफ्ते मिळाले या संदर्भात सविस्तर माहिती मिळेल.

Leave a comment